-
कोळशेवाडी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी – मोटरसायकल चोरट्याला अटक;८०,००० रुपयाची स्कुटी हस्तगत ।
डोंबिवली : कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने वाहनचोरीप्रकरणी सराईत गुन्हेगाराला अटक करत एक महत्वाचा गुन्हा उघडीस आणला आहे. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे १३ मे २०२५ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास ही कारवाई केली.कोळसेवाडी परिसरात ३०३ (२) कलमांतर्गत दाखल गुन्ह्यातील चोरी गेलेली टीव्हीएस कंपनीची एन्ट्रोक स्कुटी (क्र.एम.एच.०४ एल.यू.३१९४) संदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला होता. तपासदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पियुष मधुकर जाधव (वय २०, रा. अमूल निवास, काटेमानिवली नाका,कल्याण पूर्व ) याला लोकग्राम सर्कल,कल्याण पूर्व येथून ताब्यात घेतले.त्याच्याकडून अंदाजे ८०,००० रुपये किंमतीची स्कुटी हस्तगत करण्यात आली.ही यशस्वी कारवाई परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशानुसार आणि कल्याण सह सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली व कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या नियोजनाने पार पडली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन पाटील, तसेच पोलिस अंमलदार मिलिंद बोरसे, राजेश कापडी, भागवत सौंदाणे, भगवान सांगळे, विलास जरग , नरेंद्र दळवी, दिलीप सोनावळे व प्रदीप गीते यांनी मोलाची भूमिका बजावली.कोळसेवाडी पोलिसांची ही तत्पर व परिणामकारक कारवाई नागरिकात सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करणारी ठरली आहे ।