- डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान रस्ता रुंदीकरण प्रकरण आमदार विश्वनाथ भोईर यांनी सोडवला ।

डोंबिवली : कल्याण पश्चिम येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान बचाव समितीच्या मागणी नुसार डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान रस्ता रुंदीकरण प्रकरणात आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मध्यस्तीने आयुक्त अभिनव गोयल यांनी समितीच्या मागण्या मान्य करून रस्त्याचा विषय मार्गी लावला.त्यामुळे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे .१९९२पासून डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची जागा रस्ता रुंदीकरण करण्यासाठी घेण्यात आलेली होती. अश्या प्रकारे तीन वेळा उद्यानाची जागा घेण्यात आली. त्या विरोधात डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान बचाव समितीने तीव्र आंदोलन उभे केले होते. आणि उद्यानाची जागा वाढवून द्यावी अशी मागणी सतत लावून धरली होती. स्मार्ट सिटी तर्फे आता उड्डाणपुलाचे काम सुरु करण्यात आलेले आहे. काम अंतिम टप्यात आहे.त्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची जागा बाधित होत आहे. आणि रस्ता रुंदीकरण करने आवश्यक आहे. अनेक दिवस महापालिकेच्या आयुक्तान बरोबर डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान बचाव समितीशी चर्चा बैठाका सुरु होत्या.आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी, आयुक्त भाऊसाहेब दांगडे, आयुक्त इंदुराणी जाखड यांनी समिती बरोबर बैठका घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान वाचवण्याचे आश्वाशन दिले. तसे पत्र दिले. ठराव केला. अडचण होती बीओटी वर जागा दिलेल्या अशोका बिल्डकॉन याच्याशी सुरु असलेल्या लावदाची. लवादाचा निर्णय होत नाही तो पर्यन्त रुक्मिणीबाईची जमीन उद्यानासाठी वाढवता येत नव्हती. या संदर्भातील तिढा सुटता सुटत नव्हता आणि स्मार्ट सिटीला रस्ता रुंदीकरण करता अडचण निर्माण होत होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान हे कल्याण पश्चिम येथील महत्वाचे ठिकाण आहे. त्या उद्यानाला इतिहासिक पार्श्वभूमी आहे. उद्यान वाढवणे आवश्यक आहे. या बाबत सर्वं आयुक्तानी सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली होती. तीच भूमिका आयुक्त अभिनव गोयल यांनी कायम ठेवावी व लवादाचा निर्णय लागताच डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची जागा वाढवून द्यावी असा मुद्दा स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर यांनी मांडला त्यास आयुक्तानी मान्यता दिली. सर्वं समाज घटकानी आमदारांच्या भूमिकेचे स्वागत केले. आणि स्मार्ट सिटीच्या कामाला उद्यापासून सुरवात होईल.
त्याच बरोबर डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या कामालाही सुरवात करण्यात येईल. या बैठकीत माजी नगरसेवक अरविंद मोरे, नगरसेवक संजय पाटील,स्थानिक नगरसेवक गणेश जाधव,मिलिंद गायकवाड,अण्णासाहेब रोकडे, डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान बचाव समितीचे अध्यक्ष पत्रकार बाबा रामटेके, राजू रणदिवे, भीमराव डोळस,ऍड घनशाम गायकवाड,बाळू कांबळे,कुमार कांबळे,सुरेश जाधव,रमेश बर्वे यांनी चर्चेत भाग घेतला आणि आमदार विश्वनाथ भोईर यांचे आभार मानले.