- अंबरनाथच्या ग्रामीण रस्त्यांचे होणार काँक्रिटीकरण
- खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून नऊ कोटी मंजूर
- सहा रस्त्यांचे होणार काम ।
प्रमोद कुमार
अंबरनाथ : शहरातील वाहतूक आणि दळणवळण गतिमान करण्यासोबतच ग्रामीण भागातील वाहतूकही विना अडथळा व्हावी यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रयत्नशील असतात. त्यांच्याच प्रयत्नातून अंबरनाथ तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी तब्बल नऊ कोटी ८९ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून सहा महत्त्वाच्या रस्त्यांचे काम केले जाणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात गतिमान वाहतुकीचे अनेक प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत. उन्नत मार्ग रेल्वे मेट्रो रेल हे प्रकल्पही वेगाने प्रगतीपदावर आहेत. या मार्गांच्या उभारणीमुळे शहरातील वाहतूक गतिमान होणार आहे. प्रवाशांचा वेळ वाचून सुखकर प्रवास करता येणार आहे. शहरी भागातील ही वाहतूक व्यवस्था अध्यायवत करत असतानाच लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील रस्ते ही मजबूत केले जात आहेत. ग्रामीण भागातील वाहतूक विना अडथळा होत असल्याने ग्रामीण भागाचा विकास होतो आहे. अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून रस्त्यांची जाळे विणले जाते आहे. याचाच भाग म्हणून नुकताच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून अंबरनाथ तालुक्यातील सहा महत्त्वाच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. एकूण नऊ किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. नऊ कोटी 89 लाख रुपये खर्चातून हे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. यात पुढील दोन वर्ष रस्त्यांची देखभाल दुरुस्ती समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे रस्ते काँक्रिटीकरण नंतर देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सुद्धा कंत्राटदारावर असेल. गोरपे ते मंगरूळ, कुंभार्ली जोड रस्ता, करवले – पोसरी ते काकडवाल रस्ता, करवले – नाऱ्हेण उत्तर शिव रस्ता, ढवळे ते कातकर वाडी रस्ता, ढोके ते दापिवली रस्ता अशा सहा रस्त्यांचा यात समावेश आहे.