डोंबिवली पूर्व येथे ” छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण ”
हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत दैदिप्यमान सोहळा ।
डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून घारडा सर्कल येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला असून, याचा भव्य असा अनावरण सोहळा पार पडला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या शुभहस्ते या भव्य आणि सुंदर अशा शिल्पाचे आज अनावरण करण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या डोंबिवली शहरातील पूर्व येथील घारडा सर्कल आता ” छत्रपती शिवाजी महाराज चौक ” या नावाने ओळखला जाणार आहे.