डोंबिवलीतील अनधिकृत इमारती प्रकरणात फसवणूक झालेल्या रहिवाशांना दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील राहू..!! – खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

डोंबिवलीतील अनधिकृत इमारती प्रकरणात फसवणूक झालेल्या रहिवाशांना दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील राहू..!! – खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

प्रमोद कुमार

डोंबिवली : डोंबिवली येथे सुमारे ६५ इमारती अनधिकृत ठरविण्यात आल्या आहेत. या इमारतींचे अनधिकृत पद्धतीने बांधकाम करून नागरिकांना खोटी कागदपत्र दाखवून त्यांची विक्री देखील करण्यात आली. यामुळे आज शेकडो कुटुंब या अनधिकृत इमारतींच्या विळख्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर न्यायालयाने या सर्व इमारती तोडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे नागरिकांच्या संकटात अधिक भर पडली आहे. याच पार्श्वभूमीवर आज फसवणूक झालेल्या नागरिकांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. यावेळी नागरिकांना दिलासा देण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहण्याबाबत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी यावेळी भेट घेतलेल्या नागरिकांना आश्र्वस्त केले ।