अखेर पश्चिमेकडील पाणी प्रश्नावर निघाला तोडगा: वृन्दावनच्या संप पंपाच्या अडसर दूर,आ. रवींद्र चव्हाण यांच्या सुचनेनंतर मनपाने हटवले अतिक्रमण ।

अखेर पश्चिमेकडील पाणी प्रश्नावर निघाला तोडगा: वृन्दावनच्या संप पंपाच्या अडसर दूर,आ. रवींद्र चव्हाण यांच्या सुचनेनंतर मनपाने हटवले अतिक्रमण ।

प्रमोद कुमार

डोंबिवली: भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत डोंबिवली पश्चिम भागातील पाणी पुरवठा बाबत चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी चव्हाण यांनी डोंबिवली पश्चिम वृंदावन येथील संपपंपच्या जागी असलेले अतिक्रमण हटवून संपपंपची उभारण्याचे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या होत्या. त्याची अंमलबजावणी त्वरित झाली असून आता तो अडसर दूर झाला आहे.

चव्हाण यांच्या सूचनानंतर महानगरपालिका प्रशासनाने संप पंपाच्या कामात अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवलेले असून पाणीपुरवठा करणाऱ्या संप पंपाचे काम वेगाने सुरू करण्यात आलेले आहे.

 

वृंदावन येथील जलकुंभातून होणारा पाणीपुरवठा व जलवाहिन्यांच्या आराखड्यासाठी आयआयटी मुंबईचे तज्ञ डॉक्टर अनुज कुमार घोरपडे यांनी विकसित केलेल्या शाफ्ट आणि मॅनिफोल्ड टेक्नॉलॉजी चा वापर करण्यात येणार असून या टेक्नॉलॉजी मुळे उंच सखल भागात एकसमान दाबाने पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे त्यामुळे राजू नगर व कुंभारखाण पाडा परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होऊन नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटणार असल्याचा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.