- कल्याणमध्ये मुलीला भेटायला आली, ईमान फिरले , रिक्षाचालकाने महिलेला फसवले, तब्बल ₹३,५०००० लाख सोनं केले लंपास ।
डोंबिवली : कल्याणमध्ये कोकणातून आलेल्या
महिलेची साडेतीन लाखांच्या दागिन्यांची बॅग रिक्षात विसरली गेली आणि रिक्षाचालक ती घेऊन फरार झाला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आणि तांत्रिक तपासाची चक्रे फिरवित काही तासांत आरोपीला अटक केली. कल्याण मधून धक्कदायक बातमी समोर आली आहे. कोकणातून कल्याणमध्ये आलेल्या महिलेची बॅग घेऊन रिक्षा चालक पसार झाला. धक्कदायक म्हणजे या रिक्षाचालकाच्या रिक्षावर बोगस नंबर असल्याचं उघड झालं आहे. दरम्यान पोलिसांनी काही तासांच्या कालावधीत या रिक्षा चालकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून साडे तीन लाखांचे दागिने जप्त केले गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबर रोजी कोकणातून आपल्या मुलींना दिवाळीचा फराळ देण्यासाठी आलेल्या महिलेने डोंबिवलीतील मुलीला भेटून कल्याण पूर्वेकडील दुसऱ्या मुलीकडे जाण्यासाठी निघाली. त्यासाठी सदर महिला ही शेअर रिक्षामध्ये बसली. त्यानंतर टाटा पॉवरजवळ उतरल्यावर काही वेळातच तिला आपली दागिन्यांची पिशवी रिक्षातच राहिल्याचे लक्षात आले. ज्यात साडेतीन लाखांचे दागिने व ३ तोळ्यांचे मंगळसूत्र होते. घाबरलेल्या महिलेने आपल्या मुलीला माहिती दिल्यानंतर तातडीने कल्याण गुन्हे शाखेशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने रिक्षा शोधली, मात्र त्या रिक्षात बॅग आढळली नाही. तसेच ज्या रिक्षात बॅग विसरली होती त्या रिक्षावर बोगस नंबरप्लेट असल्याची माहिती समोर . तपास पुढे नेत पोलिसांनी लक्षात आणले की, एकाच नंबरच्या दोन रिक्षा शहरात धावत आहेत. वाहतूक पोलीसांच्या मदतीने चलान शोधले. एका चलान मध्ये त्या रिक्षाचा नंबर आणि मोबाईल नंबर आढळला मोबाईलच्या नंबर आणि तांत्रीक तपासाच्या आधारे त्याच टिटवाळा परिसरात संशयित चालक जयेश गौतम याच्यापर्यंत पोहोचले. झडती घेतली असता घरातून बॅग आणि दागिने जप्त करण्यात आले. याचवेळी पोलिसांनी रिक्षाची नंबरप्लेट तपासली असता ती बोगस असल्याचे उघड झाले. आरोपीला अटक करून रिक्षा व दागिन्यांची बॅग ताब्यात घेण्यात आली आहे. या घटनेनंतर एकाच नंबरच्या एकापेक्षा जास्त रिक्षा शहरात धावत असल्याचा धक्कादायक मुद्दा ऐरणीवर आला असून, वाहतूक पोलिस आणि आरटीओ विभागाच्या देखरेखीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ।
