- मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीमुळे ११ नोव्हेंबर रोजी १२ तास पाणीपुरवठा राहणार बंद ।
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मोहिनी जलशुद्धीकरण केंद्रातील वीज व यांत्रिक उपकरणाची दुरुस्ती तसेच “अ ” प्रभागातील मांडा – टिटवाळा परिसरातील जलवाहिन्याच्या देखभालीचे काम करण्यात येणार आहेत. त्यामुळे ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वा. ते रात्री ९ वा. पर्यंत (१२ तास) कल्याण – डोंबिवली महापालिकेच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्रामधून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जनतेला आणि स्थानिक नागरिकांना गैर सोय होऊ नये म्हणून आवाहन करण्यात आले आहे या कामादरम्यान कल्याण पूर्व व पश्चिम विभागातील काही भाग तसेच कल्याण ग्रामीण विभागातील मांडा, टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड , अटाळी आणि इतर गावांमध्ये पाणीपुरवठा बंद (शट डाऊन) राहील. महापालिकेने नागरिकांना पूर्वतयारी म्हणून पिण्याचे पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले असून, या कालावधीत सहकार्य करण्याची सूचना पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केली आहे ।