- कल्याण पूर्वत राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन ।
डोंबिवली : स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका जस जशी जवळ येत आहे राजकीय पक्षाची बांधणी सुरू झाली आहे .कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) चे विधानसभा अध्यक्ष विक्रांत जगन्नाथ ( आप्पा) शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पॅनल क्र. १२ मधील गणेशवाडी, कोळशेवाडी, आनंदवाडी , लक्ष्मी बाग परिसरातील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन १७ ऑक्टोबर २०२५ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे, आमदार सुलभाताई गायकवाड, कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष विक्रांत जगन्नाथ (आप्पा) शिंदे, माजी नगरसेवक निलेश शिंदे, जिल्हा सरचिटणीस हरिश्चंद्र चंदने, मनोज नायर, समर्थ माशाळ, अथर्व शिर्के, हुमाशु गुप्ता, राजेंद्र लिंगायत, कमलेश ठाकरे, राहुल केसरवाणी, पंकज गायकवाड, राजश्री फुलपगारे, वर्षा कळके, राजश्री शिंदे, रूपाली शिंदे यासह पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी विधानसभा अध्यक्ष विक्रांत शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की,” राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आशीर्वादाने आणि जिल्हाध्यक्ष जगन्नाथ ( आप्पा ) शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे जनसंपर्क कार्यालय उभारले आहे. राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे, आणि पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनानुसार आम्ही पक्षाच्या निर्णयानुसारच पुढे वाटचाल करू, जर स्वबळावर लढण्याची वेळ आली, तर त्यासाठी आम्ही पूर्ण तयारीत आहोत. पक्षनिष्ठा आणि सहकार्याच्या भावनेने आम्ही विजय मिळवू, असे त्यांनी सांगितले. आम्ही महायुतीचा धर्म पाळू , आणि ज्या कोणी पक्षाच्या बरोबर युती होईल त्यांच्याबरोबर आम्ही पूर्ण सहाय्य करू आणि संयोगाने आम्ही निवडणुका जिंकू असे आश्वासन दिले. या भव्य उद्घाटनाने कल्याण पूर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे नवा अध्याय सुरू झाल्याची भावना कार्यकर्त्यात व्यक्त करण्यात आली ।
