दुकानदारांच्या वाढलेल्या शेडवर तसेच रस्त्यावरील फुथपाथ वर कारवाई करून रस्ते मोकळे करण्यात आले ।

  • दुकानदारांच्या वाढलेल्या शेडवर तसेच रस्त्यावरील फुथपाथ वर कारवाई करून रस्ते मोकळे करण्यात आले ।
डोंबिवली : दिनांक 10  व 11 ऑक्टोबर 2025 रोजी ह प्रभाग क्षेत्र येथील आयुक्त, उप आयुक्त भूमकर  यांच्या आदेशान्वये, सहाय्यक आयुक्त राजेश सावंत  व अतिक्रमण विभागाचे प्रमुख विजय भोईर व रमाकांत ब्रह्मदंडे  दिनकर तुपांगे पथक यांनी पोलीस बंदोबस्ताशिवाय घनश्याम गुप्ते रोड येथील  दुकानदारांच्या वाढलेल्या शेडवर तसेच रस्त्यावरील फुथपाथ वर कारवाई करून रस्ते मोकळे करण्यात आले आहेत। तसेच डोंबिवली पश्चिम ह प्रभागक्षेत्र हे एकमेव असे आहे की तिथे रेल्वे स्टेशन पासून दीडशे मीटर पर्यंत कोणत्याही फेरीवाले ना बसून देत नाही, त्यासाठी मा. नगरसेवक धात्रक दांपत्य यांची मोलाची साथ लाभलेली आहे । तसेच दोन्ही दिवशी ह प्रभाग क्षेत्रातील मुख्य रस्त्यावर अनधिकपणे टाकलेल्या फटाक्यांचे स्टॉल तसेच दुकानासमोरील शेड्स निष्कर्षित करण्यात आल्या रस्ता मोकळा करण्यात आला आहे ।