- दीपेश म्हात्रे यांच्या दहीकाला कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांचा सुतोवाच ।
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील शिवसेना ठाकरे गट व्दारे स्वराज्य दहीकाला महोत्सवाला युवा नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावून त्या प्रसंगी आपण पलावातील वर्ल्ड रेकॉर्ड पाहण्यासाठी लवकरच कल्याण डोंबिवली दौरा करणार असून दीपेश म्हात्रे आणि त्यांची टीम जोरात काम करीत आहे यावेळी सणाच्या दिवशी बालिश लोकांसारखे बोलणार नसल्याचे सांगितले ,कार्यक्रमाला माजी आ. सचिन अहिर सोबत होते आणि भव्य कार्यक्रम करणाऱ्या दीपेश म्हात्रे यांच्या कामाचे कौतुक केले । कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत लवकरच दौरा करणार असल्याचे सुतोवाच केला . रस्त्याची परिस्थिती पाहता लवकरच कल्याण डोंबिवली चा दौरा करणार असल्याचे सांगितले असून पलावा चा वर्ल्ड रेकॉर्ड पाहण्यासाठी लवकरच पुन्हा डोंबिवलीत येणार आहे . महाराष्ट्राचे राजकारण पाहतात दोन्ही भाऊ एकत्र येण्याबाबत निर्णय घेतील . राजकीय विषयांवर बनण्यास नकार दिला .आजचा दिवस मी राजकारणावर बोलणार नाही आज फक्त बालिश लोकं राजकारणावर बोलतात दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीची रंगीत तालीम सुरू झाल्याची प्रचिती डोंबिवली मधील दहीकाला महोत्सवात आली आहे ।