- स्कायवॉक शेड तोडल्याबाबत तातडीने कारवाई व गुन्हा दाखल करण्याची मागणी ।

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या विशेष निधीतून तब्बल ₹4.5 कोटी खर्च करून डोंबिवली पूर्व व पश्चिम स्कायवॉकवर शेड बसविण्यात आली होती, जेणेकरून पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात पादचाऱ्यांना सुरक्षित व आरामदायी प्रवास करता यावा.मात्र आज सकाळी डोंबिवली पश्चिम येथील द्वारका हॉटेलसमोरील एका खासगी विकासकाच्या इमारतीचे बांधकाम तोडत असताना स्कायवॉकवरील शेडचे मोठे नुकसान झाले आहे. या स्कायवॉकवरून दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक प्रवास करत असतात. अशा वेळी जर लोखंडी व इतर साहित्य खाली कोसळले असते तर गंभीर जीवितहानी होण्याची शक्यता होती. त्यामुळे हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नसून गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणी मी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांना तात्काळ कारवाई करण्याची, संबंधित विकासकाकडूनच शेडची दुरुस्ती व पुनर्बांधणी करून घेण्याची, त्याचा संपूर्ण खर्च विकासकाकडून वसूल करण्याची, तसेच कातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

-
सार्वजनिक पैशातून उभारलेली सोय नष्ट होणे आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होणे हा जनतेचा व कायद्याचा अपमान असून अशा प्रकारांना प्रोत्साहन न देण्यासाठी कठोर पावले उचलली जाणे अत्यावश्यक आहे.
-
दिपेश पुंडलीक म्हात्रे जिल्हाप्रमुख शिवसेना कल्याण