- लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले नवोगतांचे स्वागत!
प्रमोद कुमार
नवी मुंबई : आज नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश केला असून दरम्यान रायगड जिल्हा परिषद कळंबोली प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वागत करत सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक व मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक गोपाळ भगत, रविंद्र भगत, विजय खानावकर, राजेंद्र शर्मा, कळंबोली भाजपचे माजी अध्यक्ष रविनाथ पाटील, शाळा व्यवस्थापक संस्थेचे अध्यक्ष अनंत भगत व इतर मान्यवर उपस्थित होते.