लवकरच पूर्ण होणार रिंगरोड, कल्याण-डोंबिवलीकरांची वाहतूक कोंडीतून कधी सुटका होणार? आयुक्तांनी सांगितली तारीख 

  • लवकरच पूर्ण होणार रिंगरोड, कल्याण-डोंबिवलीकरांची वाहतूक कोंडीतून कधी सुटका होणार? आयुक्तांनी सांगितली तारीख 
डोंबिवली :  कल्याण डोंबिवलीतील रिंगरोड प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याला वेग. आयुक्त अभिनव गोयल यांनी पाहणी करून पालिका नगररचना विभागाच्या अधिकारी वर्ग शहर अभियंता अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.कल्याणात वाहतूक कोंडी नागरिक मोठ्या प्रमाणात  हैराण झाले आहेत रिंग रूट रस्त्या झाल्यास वाहनाची  वर्दळ कमी होऊन वाहतूक कोंडी पासून सुटका होणार आहेत । कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीचा फटका बसतो. यामुळे प्रवाशांचा तासंतास वेळ जातो. दरम्यान, लवकरच वाहतूक कोंडीवर तोडगा निघणार आहे. रिंगरोड प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामाला वेग आला आहे. गोविंदवाडी बायपास ते मोठागाव मानकोली पुलापर्यंतचा हा टप्पा पुढील आठ महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली आहे. कल्याण-डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सुरू असलेल्या रिंगरोड प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामाला आता गती मिळणार आहे. अशी माहिती आयुक्त गोयल यांनी दिली. या मार्गावरील अडथळ्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. या प्रकल्पाविषयी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी पुनर्वसन आणि मोबदला प्रक्रियेबाबत तातडीने निर्णय घेऊन जागा हस्तांतरणाची प्रक्रिया गतीमान करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या, अशी माहिती अभिनव गोयल यांनी दिली. या रिंगरोडच्या तिसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कल्याण, डोंबिवली, मानकोली परिसरातील वाहतूक सुलभ होणार आहे .प्रवाशांचा वेळ वाचणार. तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील ताण कमी होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी नगररचना कार सुरेन्द्र टेंगळे  शहर अभियंता अनिता परदेसी, उपायुक्त योगेश गोडसे, आणि पालिका अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते ।