- डोंबिवलीत शेलार नाका परिसरात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा ,मोठ्या संख्येने नागरिक, शालेय विद्यार्थी उपस्थित ।

डोंबिवली : डोंबिवलीतील माजी नगरसेवक सदाशिव शेलार यांच्या जनसंपर्क कार्यालय शेलार नाका येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन झेंडा वंदनकरून साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, शालेय विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सदाशिव शेलार यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले की आज देश पारतंत्र्याकडे जाण्याच्या मार्गावर आहे, तरी लोकांनी संविधानाचा अभ्यास करून व स्वतःच्या हक्कासाठी,स्वातंत्र्यासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचे सांगत, नागरिकांनी सावधान व्हावं आणि राहुल गांधीनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याला पाठिंबाला द्यावा. यावेळी माजी नगरसेवक सदाशिव शेलार, समाजसेवक उद्योजक अजय शेलार, दशरथ म्हात्रे, हिस्मन मोरे, मच्छिंद्र सुतारे, बाबू सरोदे, राहुल पठाडे, शरद रायबन, सलील चौधरी, मनोज जसवाल इतर कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ।
Post Views: 29