- उल्हास नदीतील प्रदूषण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून महत्त्वाची बैठक संपन्न ।
-
आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे ।प्रमोद कुमारकल्याण : उल्हास नदीतील प्रदूषणाविरोधात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असणारे माजी नगरसेवक नितीन निकम, कैलास शिंदे, उमेश बोरगावकर यांच्यासह श्रीधर घाणेकर, शशिकांत दायमा आणि मी कल्याणकर संस्थेचे प्रमुख नितीन निकम यांचे बेमुदत आंदोलन आज मागे घेण्यात आले. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांच्या मध्यस्थीनंतर तसेच उल्हास नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार असल्याच्या आश्वासनानंतर निकम यांनी आपले उपोषण मागे घेतले. दरम्यान या मुद्द्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पुढाकाराने आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या प्रयत्नातून राज्याचे नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिम गुप्ता आणि महाराष्ट्र प्रदेश नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उल्हास नदीबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.उल्हास नदीमध्ये प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात जलपर्णी तयार झाली असून त्याकडे होत असलेल्या शासनाच्या दुर्लक्षाविरोधात माजी नगरसेवक आणि मी कल्याणकर संस्थेचे प्रमुख नितीन निकम हे गेल्या आठ दिवसांपासून नदीपात्रामध्येच आंदोलनाला बसले होते. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पुढाकाराने आणि खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या प्रयत्नातून एक बैठक पार पडली. या बैठकीला कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर साहेब हेदेखील उपस्थित होते.या बैठकीमध्ये उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्याठी टास्क फोर्स तयार करणे, नितीन निकम व त्यांचे सहकारी यांनी केलेल्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करुन नदी पात्रातील जलपर्णी लवकर दूर करणे, ही जलपर्णी दूर करण्यासाठी १० मशीन भाडेतत्वावर घेणे, केवळ उल्हास नदीच नाही तर सर्व नदी पात्रातील पाण्यातील जलपर्णी दूर करण्यासारखे महत्त्वाचे निर्णय खासदार डॉ.श्रीकांत शिंदे साहेब यांच्या सूचनेनंतर घेण्यात आले। तर उल्हास नदीला येऊन मिळणाऱ्या सांडपाण्याचे नाले बंद करण्यासाठी एसटीपी प्लांट उभारण्यासाठी एमपीसीबीकडून निधी दिला जाणार आहे. उल्हास नदीतील मोहने बंधारा जुना झाला असून तो नव्याने बांधण्यात यावा आणि कल्याण ते बदलापूर दरम्यान नदी पात्राचे शुद्धीकरण, नदी पात्रात रासायनिक पाण्याचे टँकर सोडणाऱ्या टॅंकर चालक, सहाय्यकासह टॅंकर मालकाविरोधातही गुन्हा दाखल करण्याची मागणी नितीन निकम, कैलास शिंदे, उमेश बोरगांवकर, श्रीधर घाणेकर, शशिकांत दायमा व मी कल्याणकर संस्थेचे पदाधिकारी यांनी केली होती. त्यावरही या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन खा.डॉ.शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांनी नितीन निकम व त्यांचे सहकारी यांना दिली. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉ श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्यासह संपूर्ण राज्य सरकार याप्रश्नी गांभीर्याने उपाययोजना करेल असेही आश्वस्त केले. आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांनी दिलेल्या माहितीनंतर आणि राज्य शासनाने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर माजी नगरसेवक नितीन निकम आणि कैलास शिंदे, उमेश बोरगावकर व मी कल्याणकर संस्थेचे सर्व सहकारी यांनी आपले उपोषण मागे घेतले । याप्रसंगी जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, विधानसभा संघटक प्रभुनाथ भोईर, उपशहर प्रमुख अंकुश जोगदंड, युवासेना शहर प्रमुख दिनेश निकम, विभाग प्रमुख राम तरे, विधानसभा सहसंघटक विजय परियार, नाना काटकर, शाखा प्रमुख रोहन कोट, महेश पाटील, कृष्णा सेल्वराज, तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी याठिकाणी उपस्थित होते ।
Post Views: 216