रागाई मंदिर ते कुंभारखानपाडागणेश विसर्जन घाट व रागाई मंदिर ते श्रीधर म्हात्रे चौक पर्यत रस्ता काँक्रिटीकरण रस्ता करण्यात येत आहे ।

  • रागाई मंदिर ते कुंभारखानपाडागणेश विसर्जन घाट व रागाई मंदिर ते श्रीधर म्हात्रे चौक पर्यत रस्ता काँक्रिटीकरण रस्ता करण्यात येत आहे ।
  • कार्यक्रमाचे भूमिपूजन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले ।
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेकडील राजूनगर प्रभागातील वीर जिजामाता रोडवरील भोलेनाथ चौक ते रागाई मंदिर चौक आणि रागाई मंदिर ते कुंभारखानपाडागणेश विसर्जन घाट व रागाई मंदिर ते श्रीधर म्हात्रे चौक पर्यत रस्ता काँक्रिटीकरण रस्ता करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे भूमिपूजन रविवार 26 तारखेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. सदर प्रभाग हा नुकतेच भाजपमधून राजीनामा दिलेले विकास म्हात्रे यांचा आहे. या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती नव्हती. मात्र कार्यक्रमाच्या नंतर जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि विकासमंत्र्यांची भेट झाली. त्यावेळेस माजी मगरसेवक विकास म्हात्रे यांनी भाजपाचे आभार मानले. तर त्यांनी सात वर्षानंतर माझ्या प्रभागामध्ये विकास काम होत आहे त्याबद्दल मी प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो, कारण की मी विकास निधी मागत होतो परंतु मला विकास निधी दिला नाही आज ज्यावेळेस मी राजीनामा देतोय त्यावेळेस इथे विकास कामांना सुरुवात झाली असे म्हात्रे म्हणाले. पत्रकारांनी माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांना त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबद्दल विचारले जो प्रभागाचा विकास करेल त्याच्या पाठीमागे आहोत उत्तर दिले. यावेळी कल्याण जिल्हाअध्यक्ष नंदू परब, डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष पवन पाटील, डोंबिवली पश्चिम मंडळ महिला अध्यक्षा प्रिया जोशी, जुनी डोंबिवली मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष सुजय विचारे, प्रशांत पाटेकर (लारा), जितेंद्र म्हात्रे, नंदू म्हात्रे, हृदयनाथ भोईर  यांसह अनेक पदाधिकारी, व कार्यकर्ते उपस्थित होते ।