- १३ आरोपींकडून ११५ किलो गांजा, पिस्टल, काडतुसे, वॉकी-टॉकी, मोटार कार, आटो रिक्षा, दुचाकी हस्तगत ।
डोंबिवली : परिमंडळ – ३ कल्याण पोलीसांनी आंतर-राज्य “गांजा” तस्करींची साखळी उघडकीस आणुन कल्याण सह सोलापुर, विशाखापटणम् (आंध्रप्रदेश) या ठिकाणांवरून एकुण १३ आरोपींना ११५ किलो गांजा, पिस्टल, काडतुसे, वॉकी-टॉकी, मोटार कार, अॅटो रिक्षा, दुचाकी वाहने असे एकुण सत्तर लाख तीन हजार रूपये किंमतीच्या मुददेमालासह जेरबंद केले असल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. कल्याण व डोंबिवली शहर परिसरात बेकायदेशीर अंमली पदार्थ विकी करणारे पेडलर यांच्यावर कारवाई करण्याकरीता पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ३, कल्याण यांच्या विशेष कारवाई पथकाने व खडकपाडा पोलीस ठाणे यांनी दि. २ ऑगस्ट रोजी खडकपाडा पोलीसांनी आंबिवली जवळ ३ आरोपींना गांजासह अटक केली होती. या गुन्हयाचा पोलीस पथकाने शिताफीने तपास करून, गुन्हयांचे धागे-दोरे हे कल्याण शहरा सोबतच बदलापुर, ठाणे, सह सोलापुर जिल्हा तसेच महाराष्ट्र राज्या बाहेरील विशाखापट्टणम राज्य आंध्रप्रदेश पर्यत पोहचलेले असल्याचे निष्पन्न करून तसे पुरावे प्राप्त केले. गुन्हयाच्या तपासात प्राप्त पुराव्यांचे तात्रिंक विश्लेषण करून तसेच माहितीच्या आधारे पोलीस उप-आयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदशनाखाली विविध तपास पथकं ही बदलापुर, ठाणे, सोलापुर जिल्हा, विशाखापट्टणम राज्य आंध्रप्रदेश आदी ठिकाणी पाठवुन आरोपींना जेरबंद करून त्यांच्या ताब्यातील अंमली पदार्थ तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहने, मोबाईल, रोख रक्कम तसेच प्राणघातक अग्नीशस्त्रे तसेच जिवंत काडतुसे व वॉकीटॉकी असे साहीत्य हस्तगत केले आहे. विशाखापट्टनम, आध्रप्रदेश येथील जंगलपरिसरात गांजाची वाहतुक करण्याकरीता आरोपी हे आपसात संपर्कात राहण्यासाठी वॉकीटॉकी वापरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या गुन्हयात बाबर शेख, गुफरान शेख, सुनिल राठोड, आझाद शेख, रेश्मा शेख, शुभम भंडारी, सोनु सय्यद, आसिफ शेख, प्रथमेश नलवडे, रितेश गायकवाड, अंबादास खामकर, आकाश भिताडे, योगेश जोथ या आरोपींना अटक करण्यात आली आहे. हि कामगिरी अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उप-आयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहायक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, खडकपाडा पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांच्या देखरेखीखाली पोलीस निरीक्षक मारुती आंधळे, साबाजी नाईक, कोळसेवाडी पोलीस स्टेशन स.पो.नि. अनिल गायकवाड, विजय गायकवाड, संदिप भालेराव, पो. उप. निरी. जितेंद्र ठोके, पो हवा. सदाशिव देवरे, राजु लोखंडे, संदिप भोईर, योगेश बुधकर, निसार पिंजारी, पो.शि. सुरज खंडाळे, अनिल अरसान, राहुल शिंदे, अमित शिंदे, खुशाल नेरकर, कांतीलाल वारघडे, अनंत देसले, सुरेश खंडाळे यांनी केली आहे ।