राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वर मिलिंद एकबोट यांनी टीका केल्याने कल्याणात निषेधार्थ निदर्शने ।

  • राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वर मिलिंद एकबोट यांनी टीका केल्याने कल्याणात निषेधार्थ निदर्शने ।

डोंबिवली : महायुतीची सत्ता राज्यात असताना भाजपशी जवळकी असणारे नेते , पदाधिकारी सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना टीका करताना दिसत आहे .राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्यावर मिलिंद एकबोटे यांनी टीका केल्याच्या कल्याणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सायंकाळी शिवाजी चौकात निषेध व्यक्त करीत निदर्शने केली. हिंदुत्त्ववादी आणि महाराष्ट्र गोसेवा संघाचे कार्यकर्ते मिलिंद एकबोटे यांनी पुण्यातील एका सभेत देशी गायींचे संगोपन आणि संवर्धन यावर भाष्य करीत जर्सी गायींचे दूध आरोग्यास योग्य नाही. याच गायींच्या दुधामुळे नपुंसकता आली असल्याचा खळबळजनक दावा केला होता हा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पक्षाध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोडून काढून “मला कुरेशी लोकांवर अन्याय झाल्याचे चालणार नाही” असे वक्तव्य केल्याने मिलिंद एकबोटे यांनी अजित पवार यांना “जनाची नाही तर मनाची बाळगायला हवी होती” अशी खालच्या पातळीवर येऊन टीका केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे कार्यकर्ते मध्ये संतापाची लाट पसरली आहे.याचे पडसात संपूर्ण महाराष्ट्रात पसरून ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाकडून निषेध आंदोलन केली जात आहे. दरम्यान कल्याणातील राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे नेते माजी आमदार जगन्नाथ उर्फ अप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली मंगळवारी सायंकाळी कल्याण पूर्व कडील काटेमानवली नाका व कल्याण पश्चिमे कडील शिवाजी चौकात मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात
कल्याण डोंबिवली जिल्हाचे पदाधिकारी सुभाष गायकवाड ,रामचंद्र यावलकर ,विनोद भोईर ,रश्मी कोलते , उदय जाधव ,दर्शन देशमुख,जयेश पाटील,रेखा ताई सोनवणे,संतोष पाटील ,गोरख शिंदे , हुजुर कुरेशी,दाजी साठे संध्या साठे,छाया इंगळे व इतर कार्यकर्त्यांनी मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात घोषणा बाजी करीत त्याचा फोटोवर फुल्ली मारीत जोरदार निदर्शने केली ।