शिवसेनेत मनसे व राष्ट्रवादीच्या (शरद पवार) माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडले पक्षप्रवेश अंबरनाथ आणि कल्याण येथील माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश

  • शिवसेनेत मनसे व राष्ट्रवादीच्या (शरद पवार) माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश 

  • राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडले पक्षप्रवेश 

  • अंबरनाथ आणि कल्याण येथील माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश 

प्रमोद कुमार 

डोंबिवली : राज्यात शिवसेनेत पक्ष प्रवेशाची लाट सुरू असून, आज ठाण्यातील आनंद आश्रम येथे कल्याण लोकसभेतील  प्रभावी पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडलेल्या या प्रवेशामुळे कल्याण-डोंबिवली आणि अंबरनाथ विभागातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली आहे. यावेळी अंबरनाथ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष, माजी नगरसेवक व माजी सभापती कुणाल भोईर, जिल्हा संघटक व माजी नगरसेवक संदीप लकडे, शहर संघटक व माजी नगरसेवक स्वप्नील बागुल, माजी नगरसेविका अपर्णा कुणाल भोईर, विभाग अध्यक्ष चंद्रकांत चौघुले, महेश सावंत, प्रशांत भोईर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्याचबरोबर अंबरनाथ शहरातील मनसेचे उपविभागाध्यक्ष, शाखाध्यक्ष, पदाधिकारी आणि अनेक मनसैनिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. मनसेसोबतच इतर पक्षांतूनही मोठा ओघ दिसून आला. कल्याण पश्चिमचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेश बोरगावकर, वॉर्ड अध्यक्ष गोरख साबळे, महिला वॉर्ड अध्यक्ष उषा गोरे, तसेच उबाठा गटाचे टिटवाळा उपशहरप्रमुख श्रीधर दादा खिस्मतराव, शाखाप्रमुख ज्ञानेश्वर मडवी, उपविभाग प्रमुख प्रशांत मोहिते, उपशाखा प्रमुख गजानन पाटील आणि त्यांच्या पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या सदस्यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्यात स्थानिक लोकप्रतिनिधी, शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी, महिला आघाडी आणि शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी नव्याने प्रवेश केलेल्या सर्वांचे जाहीर स्वागत करण्यात आले आणि त्यांच्या पुढील राजकीय-सामाजिक प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तर अंबरनाथच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व माजी नगरसेवकांचे त्यांच्या विभागात अतिशय उत्तम असे काम आहे. आगामी काळात या सर्वांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेला अंबरनाथ शहरात अधिक बळकटी मिळाली असल्याचे मत यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या माध्यमातून राज्यभरात मोठ्या प्रमाणात जनहिताची कामे सुरू आहेत. ग्रामीण व शहरी भागात जनतेचा विश्वास शिवसेनेवर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रस्ते, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, गृहनिर्माण आणि आरोग्य या क्षेत्रातील ठोस कामगिरीसोबतच संघटना थेट जनतेशी जोडली गेल्याने मोठा जनाधार संघटनेला मिळत आहे. आजच्या या पक्ष प्रवेशामुळे कल्याण-डोंबिवली आणि अंबरनाथ विभागातील राजकीय समीकरणांवर या प्रवेशाचा दूरगामी परिणाम होणार असून, स्थानिक पातळीवरील संघटनात्मक कामकाजाला नवे बळ मिळणार आहे. तर आगामी महापालिका आणि पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेले हे पक्षप्रवेश अत्यंत महत्वाचे मानले जात आहे ।