बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपींना अटक ।

  • बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपींना अटक ।

कल्याण : कल्याण परिमंडळ ३ अंतर्गत पोलीस उपायुक्त यांच्या विशेष कारवाई पथकाने, व खडकपाडा पोलीस ठाणे यांनी परिमंडळात बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी बाजारपेठ पोलीस ठाणे हददीत फोर्टीस हॉस्पीटल समोर ए.पी.एम.सी मार्केटच्या मागील रोडवर विशेष कारवाई पथक गस्त घालत असताना दोन इसम मेफेड्रॉन (एम.डी) हा अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने मिळुन आल्याने त्याबाबत अधिक तपास केले असता त्याच्याकडे ११० ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एम.डी) अंदाजे २२ लाख रुपये किंमतीचा हा अंमली पदार्थ मिळून आला. याप्रकरणी आरोपी मोहम्मद कैफ मन्सुर शेख, वय २४ वर्षे रा. बैलबाजार व फरदीन आसीफ शेख वय २४ वर्षे रा.ड्रिम कॉम्पलेक्स, कोनगांव भिंवडी यास ताब्यात घेण्यात आले. आरोपींवर बाजारपेठ पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पुढील तपास चालु आहे. तर गुरुवारी खडकपाडा पोलीस ठाणे हददीत योगी धाम या ठिकाणी रवि शिवाजी गवळी वय. ३० वर्षे रा. अनुपमनगर याच्याकडे ११२० ग्रॅम इतका अंदाजे रू.२५ हजार किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ विकी करण्याच्या उद्देशाने मिळून आल्याने आरोपींवर खडकपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून पुढील तपास चालु आहे. हि कामगिरी परिमंडळ ३ कल्याण विशेष कारवाई पथक व पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे केली आहे. अशा प्रकारे परिमंडळ ३ कल्याण मध्ये अंमली पदार्थ विकी विरूध्द कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिली ।