- कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या आगामी पालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर
डोंबिवली : केडीएमसी वॉर्ड प्रारूप आराखडा करण्यात आला होता ओ बी सी स्थानिक आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात गेल्याने पाच वर्षापासून निवडणुका झाल्या नाहीत .मात्र कोर्टाने निवडणूक घेण्याचे आदेश देत सहा महिन्या त पालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तारखा जाहीर कराव्यात. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या आदेशाने प्रशासन कामाला लागले आहे कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या आगामी पालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा शुक्रवारी जाहीर झाला असून १२२ सदस्य निवडीसाठी चार सदस्यांचे २९ पॅनल तर तीन सदस्यांचे दोन पॅनल असे ३२ पॅनल मधून १२२ प्रभागासाठी निवडणूक होणार आहे.कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची मुदत २०२० मध्ये संपली असून कोरोनामुळे निवडणुका होऊ न शकल्यानं गेल्या ५ वर्षांपासून पालिकेवर आजमिती पर्यंत प्रशासकीय राजवट आहे. यंदाची आगामी पालिका निवडणुका प्रथमच बहु सदस्यीय पॅनल पद्धतीने घेतली जाणार असून चार प्रभागाचा एक पॅनल असल्याने सर्वच राजकीय पक्षा सह इच्यूक उमेदवारांना प्रभागाची रचना कशी असणार असून कोणकोणते चार प्रभाग एकमेकाना जोडून पॅनल तयार केला आहे याची उत्कंठा सगळ्यांना लागून राहिली आहे.पालिकेतील १२२ प्रभागा करिता १२२ सदस्य निवडीसाठी बहु सदस्यीय पद्धतीने म्हणजेच चार सदस्यीय प्रभाग पॅनल पद्धतीने ३२ पॅनल ची निवडणूक घेण्यात येणार आहे .या मध्ये चार सदस्यांचे २९ पॅनल तर तीन सदस्यांचे दोन पॅनल असे ३२ पॅनल मधून १२२ प्रभागासाठी १२२ सदस्य निवडी साठी निवडणूक होणार आहे .या रचनेवर ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत पालिका आयुक्तांकडे नगरपालिकेत हरकती आणि सूचना नोंदवता येणार असून त्यावर सुनावणी होऊन त्यानंतर अंतिम आराखडा जाहीर होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन व मनपा वेबसाईटवरती आलेल्या हरकती व सूचना स्विकारल्या जाणार नसून प्रभागांच्या भौगोलिक सीमाची प्रारूप अधिसुचना व प्रभागांच्या सीमा दर्शविणारे नकाशे कार्यालयीन वेळेत नागरीकांच्या पाहण्यासाठी प्रभाग कार्यालय १-अ, २-व, ३-क, ४-जे, ५-ड, ६-फ, ७-ह, ८-ग, ९-आय, १०-ई या ठिकाणी, तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका, मुख्यालय शंकरराव चौक, कल्याण पश्चिम येथे उपलब्ध करण्यात आली आहे तसेच हरकती व सूचना दाखल करणा-या नागरिकांना सुनावणीकरीता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येईल अशी माहिती पालिके कडून मिळाली आहे.वॉर्ड प्रारूप आराखडा हरकती घेण्यासाठी २५ ऑगस्ट ते 4 सप्टेंबर कालावधी देण्यात आला असल्याचे पालिकेने सांगितले आहेत ।