ड प्रभागात फेरीवाले हातगाड्यांवर कारवाई कार्यालयाबाहेर साहित्याचा ढीग ।

  • ड प्रभागात फेरीवाले हातगाड्यांवर कारवाई

  • कार्यालयाबाहेर साहित्याचा ढीग ।

डोंबिवली :- कल्याण पूर्वेतील अनेक भागात वाहतूक कोंडी होत आहे बेशिस्तीत लावण्यात येणारे हातगाड्या, फेरीवाले यांनी नागरिक त्रस्त होते  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल , यांचे आदेशान्वये व अतिरिक्त योगेश गोडसे , व उप आयुक्त, अतिक्रमण विभाग समीर भुमकर सर यांचे मार्गदशनाखाली कल्याण पुर्वेतील प्रभाग क्र. ५ /ड प्रभागक्षेत्र अंतर्गत सहा. आयुक्त उमेश यमगर व त्यांचे अधिपत्त्याखालील  पथक प्रमुख जेम्स कदम ,पथक प्रमुख उमेश जाधव ,कामगार अरविंद मस्कर ,कामगार किशोर पगारे कामगार अशोक शीलवंत ,प्रदीप पाटील पथकाने यांनी अनधिकृतपणे विक्री व्यवसायक करणारे फेरीवाले व इतर यांचेवर धडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली असून अद्याप पर्यंत एकुण ५० ते ५२ . इतक्या हातगाडया जप्त केलेल्या आहेत. तसेच जास्त करुन प्रभाग क्षेत्रातील पुनालिंक लोड, श्रीमलंग रोड, १०० फुटी रोड, खडेगोळवली गाव रस्ता, विठ्ठलवाडी स्टेशन रस्ता व म्हात्रे नाका तसेच इतर गर्दीचे ठिकाणे इत्यादी ठिकाणी प्रभावी कारवाई होण्याच्या दृष्टीकोनातून कारवाईचे नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच सर्व संबंधीतांना जाहीरपणे आवाहन करण्यात येते की, कृपया आपली जप्त केलेली हातगाडी परत मिळणेकामी आपण प्रभागकार्यालयात येऊ नये, कारण सदर कारवाई बाबत आपणास यापुर्वीच महापालिकेच्या सोशल मिडीया साईटद्वारे सुचित करण्यात आलेले आहे. सदरची कारवाई याच प्रमाणे निरंतर चालू राहणार आहे, याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी.दोन दिवसां फेरीवाले आणि बेकायदेशीर पणे हातगाड्या लावून व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.